द्राक्ष निर्यातीकरिता फायटोसॅनिटरी सर्टीफिकेट व इतर आवश्यकबाबी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गोविंद ग. हांडे (एमएससी, कृषि किटक शास्त्र), कृषि अधिकारी

 

एका देशातुन दुस-या देशास कृषि ूाजलाची निर्यात करण्याकरिता जागतिक पिकसंरक्षण करार १९५१ (Internation Plant Protection Convertion, 1951) नुसार फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जागतिक पिकसंरक्षण कराराचे १६५ देश सदस्य असून भारत एक सदस्य देश आहे. केंद्र शासनाने अधिसुचना क्रमांक पीपीआय/९८/ दिनांक २९/१०/१९९३ अन्वये राज्यातील ११ अधिका-यांना फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देणारे अधिकारी म्हणून अधिसुचित केलेले आहे. त्यामध्ये पुणे,सांगली,नाशिक, सोलापूर, अमरावती, रत्नागिरी  व सिंधुदूर्ग या जिल्हयातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयातील अधिका-यांचा समावेश व सदर अधिका-यामार्फत  कृषि मालाच्या निर्यातीकरीता फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाते.

 

राज्यातून द्राक्ष पिकांचे मोठया प्रमाणात युरोपियन देशांन निर्यात केली जाते य़ुरोपियन देशांने द्राक्षाचे निर्यातीकरीता किडनाशकांचा उर्वरीत अंश तपासणीचे कडक निकष तयार केलेले आहेत. त्यामध्ये ८१ किटकनाशक औषधाची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या सर्व बाबीचा विचार करुन  युरोपियान देशांना जास्तीतजास्त द्राक्ष निर्यात होण्याकरीता सन २००५-०६ या वर्षात अपेडा यांच्या मार्गदर्शनाखाली युरोपियन देशांना द्राक्षाची निर्यात करण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत ट्रेड नोटीस क्रमांक क्युएमसी/०४९/२००५ दिनांक १९ ऑक्टोबर २००५ अन्वये सविस्तर मार्गदर्शन सुचना तयार करण्यात आलेले आहेत. त्याची अंमलबजावणी संचालक फलोत्पादन यांच्या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

 

युरोपियन युनियन मध्ये खालील प्रमुख देशांचा समावेश आहे.

 

अ. क़्र.

युरोपियन युनियनमधील प्रमुख आयातदार देशांची नांवे

1

युनायटेड किंगडम ‌(युके)

नैदरलँड

बेल्जियम

जर्मनी

फ्रान्स

इटली

पोलंड

स्पेन

स्विडन

१०

ग्रीस

 

सन २००५-०६ या वर्षामध्ये युरोपियन देशांना निर्यात होणा-या द्राक्षामधील उर्वरित अंश नियंत्रणाबाबत अपेडामार्फत तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये मागील वर्षी आढळून आलेल्या अडचणी व त्रुटींचा विचार करुन तसेच युरोपियन युनियनने  केलेल्या सुचना व इतर सर्व बाबींचा विचार करुन चालू वर्षाकरिता युरोपियन देशांना निर्यात होणा-या द्राक्षामधील किडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत खालीलप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येत आहेत.

 

निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याची पध्दत :-

युरोपियन देशांना निर्यात करु इच्छिणा-या द्राक्ष बागायतदारांनी त्यांच्या द्राक्ष बागेची नोंदणी संबंधित जिल्हयाचे नोंदणी अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे दि. ३० डिसेंबर २००५ पुर्वी करणे आवश्यक आहे. तसेच निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर, बीड, बुलढाणा, जळगांव व नांदेड यांना निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे.

 

निर्यातक्षम द्राक्ष बागाची नोंदणी करण्याकरीता प्रती प्लॉट (१ हैक्टर क्षेत्र) करिता रु. ५०/- फी विहित करण्यात आलेली आहे. निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी चालू वर्षी अपेडाच्या वेबसाईटवर ऑन लाईन करण्यात आलेली आहे (www.apeda.com) सन २००६-०७ मध्ये एकूण १९२९१ बांगांची नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यांचा जिल्हानिहाय तपशिल खालीलप्रमाणे आहे.

 

. क़्र.

जिल्हा

नोंदणीकृत द्राक्ष बागांची संख्या

1

नाशिक

१४,३३२

सांगली

,१९९

पुणे

६४०

लातूर

५६०

अहमदनगर

५३६

सोलापूर

४०४

सातारा

३७६

उस्मानाबाद

१८८

कोल्हापूर

२४

१०

बीड

१५

११

औरंगाबाद

१२

नांदेड

१३

जळगाव

 

एकूण

१९,२९१

 

निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांना युरोपियन देशांना निर्यातकरु इच्छिणा-या द्राक्ष बागायतदारांना त्यांचे बागेची नोंदणी/नुतनीकरण संबधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत अपेडाच्या ऑन लाईन साईटवरुन  प्रपत्र २-अ मध्ये संबधित द्राक्ष बागायतदारांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

युरोपियन देशांना निर्यात करण्याकरिता नोंदणी केलेल्या द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष बागेवरील किडी व रोगांचे नियंत्रण करण्याकरिता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी यांनी प्रपत्र ७ मध्ये  शिफारस केल्यानुसार वापरण्याबाबत व त्याचा रकॉर्ड प्रपत्र-४ मध्ये ठेवण्याबाबत बंधनकारक करण्यात आलेले आहे.

 

नोंदणीकृत द्राक्ष बागांची तपासणी मार्गदर्शन करण्याकरिता अनुसरावयाची कार्यपध्दती:-

युरोपियन देशांना निर्यात करण्याकरिता नोंदणी करण्यात आलेल्या द्राक्ष बागांची तपासणी करण्याकरिता संबंधित मंडल कृषि अधिकारी/कृषि पर्यवेक्षक यांना तपासणी अधिकारी म्हणून २९१ अधिका-यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

निर्यातक्षम द्राक्ष बागांमधील उर्वरित अंश नियंत्रणाकरिता शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी तीन तपासण्या विहित करण्यात आलेल्या आहेत. पहिली तपासणी द्राक्ष बागेचे नुतनीकरण/नवीन नोंदणी प्रमाणपत्र देण्यापुर्वी करावयाची आहे. दुसरी तपासणी अनुक्रमे ४० ते ६० दिवसांच्या फरकाने करावयाची आहे.

निर्यातक्षम द्राक्ष बागांची तपासणी करण्याकरिता प्रपत्र ६-अ व ब विहित करण्यात आलेले आहे. त्या विहित केलेल्या प्रपत्रामध्ये संबंधित नोंदणीकृत द्राक्ष बागांची तपासणी अधिका-याने तपासणी करुन तपासणीचा अहवाल संबंधित नोंदणीकृत द्राक्ष बागायतदार व नोंदणी अधिकारी यांना द्यावयाचा आहे.

तपासणी अधिका-याने त्याच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत सर्व द्राक्ष बागायतदारांना वेळोवेळी निर्यातक्षम द्राक्ष बागेमधील उर्वरित किडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाकरिता अपेडा यांनी तयार केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार संबंधित शेतक-यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. तपासणी अधिका-याने तपासणी अहवालामध्ये त्याचे पुर्ण नाव, हुद्दा, कार्यालयाचा पत्ता व दुरध्वनी क्रमांक    नमुद करणे आवश्यक आहे तसेच जेवढया क्षेत्राची नोंदणी करण्यात आलेली आहे तेवढया क्षेत्राकरिता तपासणी अहवाल देणे आवश्यक आहे.

तपासणीचे वेळी नोंदणी करण्यात आलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र आढळून आले तर वाढीव क्षेत्राची नोंद नोंदणी प्रमाणपत्रात करुन घेण्याकरिता संबंधित शेतक-यांनी संबधित शेतक-यांकडे नोंदणी करणेकरीता कळविणे आवश्यक आहे. नोदंणीकृत द्राक्ष बागायतदारंने तपासणी अधिका-यांच्या मार्गदर्शनानुसार तपासणी ठेवणे आवश्यक आहे.

तपासणी अहवालाच्या प्रती संबंधित शेतक-यांनी तपासणी अधिका-याकडून वेळोवेळी उपलब्ध करुन घेणे आवश्यक आहे.

 

निर्यातक्षम नोंदणीकृत द्राक्ष बागेमधील उर्वरित अंश नियंत्रणाकरिता नमुने घेण्याची विहित पध्दत :-

      निर्यातक्षम नोंदणीकृत द्राक्ष बागेमधील उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता चालू वर्षी एकूण ७ प्रयोगशाळांना अपेडा यांनी अधिसुचित केलेले आहेत त्याची नांवे खालीलप्रमाणे आहेत.  

 

. क़्र.

प्रयोग शाळेचे नांव

1

किडनाशक उर्वरीत अंश प्रयोगशाळा ,पुणे-५

विमटा लॅबस लि.हैद्राबाद

रिलायबल ऍनालिटीकल लॅबोरेटरी, ठाणे

जिओक लॅब लिमिटेड,मुंबई

श्रीराम इन्स्टीटयुट लॅब बगलोर

रिजनल एगमार्क लॅबोरेटरी मुंबई

एसजीएस इंडीया लि.चैन्नई

 

निर्यातक्षम द्राक्ष बागेमधील उर्वरित अंश तपासणीकरिता द्राक्षाचे नमुने घेण्यासाठी अपेडा यानी प्रपत्र-८ मध्ये अधिसुचित केलेल्या उर्वरित अंश प्रयोगशाळेच्या प्रतिनिधीव्दारेच द्राक्षाचे नमुने घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता द्राक्षाचे नमुने घेण्यासाठी लागणारे पॅकिंग मटेरियल व इतर साहित्त्य व नमुना स्लीप विहित करण्यात आली आहे त्यानुसार व प्रपत्र ९ मध्ये विहित केलेल्या पध्दतीचा वापर करुन नमुने घेणे बंधनकारक आहे.

उर्वरित अंश तपासणीकरिता घेण्यात आलेल्या द्राक्षांचे नमुने दोन पॅकिंगमध्ये २ किलो व ३ किलोमध्ये दोन नमुने घेवुन २४ तासांचे आत संबंधित किडनाशक उर्वरित अंश प्रयोगशाळेस पाठविणे आवश्यक आहे. नमुन्यासोबत प्रपत्र ४, प्रपत्र ५ व प्रपत्र ६-सी जोडणे आवश्यक आहे.

 

द्राक्ष बागायतदारांनी  निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन विक्रीकरिता प्रामुख्याने खालील बाबीची पुर्तता / नियोजन करणे आवश्यक आहे.

१.      निर्यातक्षम द्राक्ष बागेची नोंदणी विहित मुदतीत संबधीत जिअकृअ यांचेकडे अर्ज करुन घेणे तसेच नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध करुन घेणे व नोंदणी प्रमाणपत्रातील मजकूर बरोबर असल्याचे खात्री करुन घेणे.

२.     द्राक्षावरील किडी व रोगांचे नियंत्रणाकरिता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी यांनी प्रपत्र-७ मध्ये शिफारस केलेल्याच औषधाची फवारणी करणे. एकाच औषधाची सलग फवारणी न करणे.

३.     किडी व रोगाचे नियंत्रणाकरिता वापरण्यात आलेल्या औषधाची नोंद प्रपत्र ४ मध्ये सविस्तर ठेवून ते तपासणी अधिका-याकडून स्वाक्षरीत करुन घेणे.

४.     निर्यातक्षम द्राक्ष बागाची २ वेळा तपासणी अधिका-याकडून तपासणी करुन घेणे तसेच तपासणी अहवालाचा प्रती प्राप्त करुन घेवून स्वतंत्र नस्तीस ठेवणे.

५.    द्राक्ष काढणीच्या अगोदर एक महिना फवारणी बंद करणे. औषधाची फवारणी करण्याची गरज पडल्यास तशी नोंद प्रपत्र-४ मध्ये करणे.

६.      उर्वरीत अंश तपासणी करण्याकरिता अपेडा यांनी अधिसुचित केलेल्या उर्वरीत अंश प्रयोगशाळेचा प्रतिनिधी व्दारे द्राक्षाचे नमुना घेवून नमुण्यासोबत ,नमुना स्लीप, प्रपत्र-४ द्यावे.

७.    युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता द्राक्षाचे घड, बेरीचा एकसारखा आकार १६ ते १८ (एमएक) गडद हिरवा रंग व १६ दिवस असणे आवश्यक आहे. तसेच रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

८.     द्राक्षाची निर्यात निर्यातदारामार्फत करावयाची झाल्यास जो जास्त भाव देईल अशा द्राक्ष निर्यातदारांची निवड  करणे.

९.      निवड केलेल्या द्राक्ष निर्यातदारांला प्रपत्र-५ मध्ये उर्वरीत अंश चाचणी प्रयोगशाळेत नमुना प्रमाणीत असल्याचे अहवालाची प्रत तसेच तोच माल पुरवठा केल्याबाबत हमीपत्र देणे.

१०.  द्राक्ष बागायतदारानी द्राक्षाचा  निर्यातदाराना पुरवठा करण्यापूर्वी भाव ठरवून घेणे व मालाचा पुरवठा व किमतीबाबत करार करुन घेणे बागायतदाराच्या दृष्टिने आवश्यक आहे.

 

प्राधिकृत करण्याची आवश्यकता प्राधिकृत प्रयोगशाळांची जबाबदारी :-

१.      प्राधिकृत प्रयोगशाळेने निर्यातक्षम द्राक्षामधील औषधाचे उर्वरित अंश मर्यादा प्रपत्र ११ मध्ये दिल्या- प्रमाणे सर्व औषधांकरिता ए ओ ए सी किंवा कोडेक्स पध्दतीचा अवलंब करुन तपासणी करणे आवश्यक आहे.

२.     प्राधिकृत प्रयोगशाळेने निर्यातक्षम द्राक्षामधील उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता प्रपत्र ९ मध्ये       विहित केलेल्या पध्दतीचा अवलंब करुन नमुने घेण्यासाठी प्रयोगशाळेच्या वतीने योग्य त्या प्रतिनिधीची नियुक्ती करणे आवश्यक आहे व नियुक्त केलेल्या प्रतिनिधींची नावे, पुर्ण पत्ता व दुरध्वनी क्रमांक अपेडा, एनआरसी व संचालक फलोत्पादन यांना कळविणे आवश्यक आहे.

३.     निर्यातक्षम द्राक्षामधील उर्वरित अंश तपासणीचा अहवाल प्रपत्र-१२ मध्ये विहित केलेल्या नमुन्यात द्यावयाचा आहे.

४.     प्रयोगशाळेने उर्वरित अंश तपासणीचा अहवाल चार प्रतीत तयार करावयाचा असून पहिल्या दोन प्रती संबंधित द्राक्ष उत्पादक/निर्यातदार यांना द्यावयाची आहे, तिसरी प्रत संबंधित तपासणी अधिकारी तथा मंडळ कृषि अधिकारी यांना द्यावयाची आहे व चौथी प्रत प्रयोगशाळेत कार्यालयीन प्रत म्हणून ठेवावयाची आहे. प्राधिकृत प्रयोगशाळेने उर्वरित अंश तपासणी गोषवारा प्रपत्र १३ मध्ये राष्ट्रीय रेफरल प्रयोगशाळा व अपेडा यांना दर महिन्यास पाठवावयाचा आहे.

 

फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र मिळण्याकरीता द्राक्ष निर्यातदारांने खालील कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक आहे

द्राक्ष निर्यातदारांनी युरोपियन देशांना द्राक्षाची निर्यात सुरु करण्यापूर्वी खालील बाबीबाबत माहिती करुन घेणे आवश्यक आहे.

१.      ज्रोंदणीकृत द्राक्ष बागाची निवड करुन संबधित शेतक-याकडून द्राक्ष बागाची संपूर्ण माहिती घेणे (नोंदणी प्रमाणपत्र,प्रपत्र-४ व प्रपत्र-५)

२.     ज्या देशांना द्राक्षाची निर्यात करावयाची आहे. त्या देशातील आयातदाराकडून द्राक्षाची गुणवत्ता, प्रतवारी, पॅकींग इत्यादीबाबत सविस्तर माहिती घेणे

३.     उर्वरीत अंश तपासणी करण्यासाठी अपेडा यांनी प्रमाणीत केलेल्या उर्वरीत अंश प्रयोगशाळेकडून ९० औषधाची तपासणी करुन घेणे.

४.     द्राक्षाची पॅकींग, ग्रेडींग, प्रिकुलींग व स्टफोग अपेडा यांनी मान्यता दिलेल्या कोल्डस्टोरेज मध्ये करावत

५.    युरोपियन देशांना द्राक्षाची निर्यातीकरीता निर्यातदारांनी डायरेक्टोरेट ऑफ मार्केटींग अँड इन्स्पेक्शन मुंबई यांचेकडून एगमार्कसाठी नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. तसेच द्राक्षाचे ग्रेडींगकरीता एगमार्क पुणे,नाशिक व सांगली येथील कार्यालयातुन देण्यात येते. त्यांचेकडून तपासणी करुन घेवून एगमार्क ऍथोरिटी कडून ग्रेडींग प्रमाणपत्र दिले जाते.

६.      निर्यातक्षम द्राक्षाची पॅलेट बनविण्याकरीता लाकडाचे पॅलेटचा वापर केला जातो. लाकडाच्या पॅलेटकरिता इटरनॅशनल स्टडर्ड फॉर फायटोसॅनिटरी मेजर्स (ISPM-15) -१५ अन्वये केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या पेस्ट कंट्रोल प्युमिगेंटर्स कडून लाकडी पॅलेटचे धुरीकरण करुन घेऊन त्यावर स्टॅम्प मारुन घेणे आवश्यक आहे. घुरीकरणाकरिता केंद्र शासनाने राज्यातील २१ पेस्ट कट्रोल ऑपरेटर्ससना मान्यता दिलेली आहे. त्याची नांवे (plant quarantine india.nic.in) या वेबसाईटवर उपलब्ध आहे युरोपियन देंशांना द्राक्षाचे निर्यातीकरीता फायटोचे प्रमाणपत्र देण्यासाठी संचालक फलोत्पादन यांच्या कार्यालयातील व्यापारक्षम शाखेतील कृषि उपसंचालक व कृषि अधिकारी  तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नाशिक सांगली व सोलापूर व सांगली यांच्या कार्यालयातील कृषि उपसंचालक व कृषि अधिकारी यांना फायटोसॅनिटरी इंश्युइंग ऍथोरिटी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

 

द्राक्ष निर्यातदारांनी युरोपियन देशांना द्राक्षाची निर्यातीकरीता फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र मिळण्याकरीता खालील कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक आहे.

१.      प्रपत्र अ मध्ये २ प्रतीत अर्ज

२.     प्रोफार्मा  इन्वयाईसची प्रत

३.     आयातदार व निर्यातदार यांच्यामध्ये करण्यात आलेल्या करारनामाची प्रत

४.     आयात व निर्यात कोड नंबरची प्रत

५.    उर्वरीत अंश तपासणी अहवालाची पांढरी व हिरव्या रंगाची मुळ प्रत.    

६.      कंटेनर लोडींग/पँकीग लिस्ट

७.    निर्यातक्षम द्राक्ष बांगेच्या नोंदणी प्रमाणपत्रांची प्रत

८.     नोंदणीकृत द्राक्ष बागांयतदारांचे प्रपत्र ५ मध्ये हमी पत्र

९.      नोंदणीकृत द्राक्ष बागेचे प्रपत्र ६-ब मध्ये तपासणी अधिका-यामार्फत केलेल्या तपासणी अहवालाची प्रत

१०.  प्रपत्र १५ मध्ये नोंदणीकृत द्राक्ष बांयतदाराकडूनच माल खरेदी केलेबाबत निर्यातदारांचे हमी पत्र

११.   ज्या ठिकाणी द्राक्षाची स्टपिंग करण्यात येणार आहेत. त्या शित गृहास अपेडाच्या मान्यतेची प्रत

१२.  निर्यातक्षम द्राक्षाचे एगमार्क प्रमाणीकरण करण्याकरीता डायरेक्टर ऑफ मार्केटींग ऍन्ड इन्स्पेक्शन यांच्याकडे नोंदणी केलेल्या प्रमाणपत्र तसेच सर्टिफिकेट ऑफ एगमार्क ग्रीडीची प्रत

१३.  द्राक्षाचे पॅलेटा परण्यात येणा-या लाकडी पॅलेटचे केंद्र शासन मान्यता पेस्ट कंट्रोल ऑपरेटरकडून फेमिकेशन केल्याचे प्रमाणपत्र

१४. विहित केलेली फी चलनाव्दारे कोषागारात भरल्याची चलनांची मुळ प्रत

 

वरील सर्व मुद्याबाबतची माहिती सादर केल्यानंतर फायटोसॅनिटरी सर्टीफिकेट ऍथोरिटीव्दारे निर्यातीकरिता तयार करण्यात आलेल्या द्राक्षाची तपासणी करुन त्यातून नमुना घेवून सदरची द्राक्षे किड व रोगमुक्त तसेच उर्वरीत अंश मध्ये प्रमाणीत असल्याचे तसेच आयातदार देशाच्या मागणीप्रमाणे असल्याची खात्री करुन सदर द्राक्षाच्या निर्यातीकरिता संबधीत देशाच्या प्लॅन्ट प्रोडेक्शन ऍथोरिटीच्या नावाने फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र दिले जाते सदरच्या प्रमाणपत्राशिवाय द्राक्षाची निर्यात करता येत नाही. द्राक्ष बागायतदार निर्यातदारांनी वरील बाबीची पुर्तता करण्याकरिता योग्य ते नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

 

अधिक माहिती मार्गदर्शनासाठी कृषि प्रक्रिया व्यापारक्षम शेती, साखर संकुल, पुणे ४११००५ कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घ्यावी. (फोन नं. २०-२५५३४३४९, ९४२३५७५९५६)

 

द्राक्ष बागायतदारांनी  निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन विक्रीकरिता प्रामुख्याने खालील बाबीची पुर्तता/ नियोजन करणे आवश्यक आहे.

१.      निर्यातक्षम द्राक्ष बागेची नोंदणी विहित मुदतीत संबधीत जिअकृअ यांचेकडे अर्ज करुन घेणे तसेच नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध करुन घेणे व नोंदणी प्रमाणपत्रातील मजकूर बरोबर असल्याचे खात्री करुन घेण.

२.     द्राक्षावरील किडी व रोगांचे नियंत्रणाकरिता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी यांनी प्रपत्र-७ मध्ये शिफारस केलेल्याच औषधाची फवारणी करणे. एकाच औषधाची सलग फवारणी न करणे.

३.     किडी व रोगाचे नियंत्रणाकरिता वापरण्यात आलेल्या औषधाची नोंद प्रपत्र ४ मध्ये सविस्तर ठेवून ते तपासणी अधिका-याकडून स्वाक्षरीत करुन घेणे.

४.     निर्यातक्षम द्राक्ष बागाची ३ वेळा तपासणी अधिका-याकडून तपासणी करुन घेणे तसेच तपासणी अहवालाचा प्रती प्राप्त करुन घेवून स्वतंत्र नस्तीस ठेवणे.

५.    द्राक्ष काढणीच्या अगोदर एक महिना फवारणी बंद करणे. औषधाची फवारणी करण्याची गरज पडल्यास तशी नोंद प्रपत्र-४ मध्ये करणे.

६.      उर्वरीत अंश तपासणी करण्याकरिता अपेडा यांनी अधिसुचित केलेल्या उर्वरीत अंश प्रयोगशाळेचा प्रतिनिधी व्दारे द्राक्षाचे नमुना घेवून नमुण्यासोबत ,नमुना स्लीप, प्रपत्र-४ द्यावे.

७.    युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता द्राक्षाचे घड, बेरीचा एकसारखा आकार १६ ते १८ (एमएक) गडद हिरवा रंग व १६ दिवस असणे आवश्यक आहे. तसेच रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

८.     द्राक्षाची निर्यात निर्यातदारामार्फत करावयाची झाल्यास जो जास्त भाव देईल अशा द्राक्ष निर्यातदारांची निवड  करणे.

९.      निवड केलेल्या द्राक्ष निर्यातदारांला प्रपत्र-५ मध्ये उर्वरीत अंश चाचणी प्रयोगशाळेत नमुना प्रमाणीत असल्याचे अहवालाची प्रत तसेच तोच माल पुरवठा केल्याबाबत हमीपत्र देणे.

१०.  द्राक्ष बागायतदारानी द्राक्षाचा  निर्यातदाराना पुरवठा करण्यापूर्वी भाव ठरवून घेणे व मालाचा पुरवठा व किमतीबाबत करार करुन घेणे बागायतदाराच्या दृष्टिने आवश्यक आहे.

 

      तसेच आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार १९५१ मधील विहित केलेल्या पध्दतीचा वापर करुन सर्व संबधित माहिती घेऊन निर्यातक्षम फायटोसेनिटरी प्रमाणपत्र द्यावयाचे आहे.

      रिकोगनाईज पॅकहाउस मधून द्राक्षाचा नमुना घेऊन तो व्यवस्थित मार्क करुन संबधित निर्यातदार/पॅकहऊस यांच्याकडे साठवणूक करीता द्यावयाचे आहे.

      युरोपियन देशांना निर्यात होणा-या प्रपत्र-१६ मध्ये नमुद केलेल्या पीएससी ऍथोरिटींनी फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र द्यावयाचे आहे.

      पीएसएसी ऍथोरिटीनी द्राक्ष निर्याती करीता देण्यात आलेल्या फायटोसॅनिटरी प्रमाणपत्राची माहिती दर आठवडयास प्रपत्र १५ मध्ये देणे आवश्यक आहे.

 

      युरोपियन देशांना निर्यात होणा-या द्राक्षामधील उर्वरीत अंश नियंत्रणाबाबत अपेडा यांनी विहित केलेल्या मार्गदर्शक सुचनांची काटेकोरपणे अमलबजावणी करण्यात यावी. सोबत सदर मार्गदर्शक पुस्तिकेची प्रत जोडली आहे. तसेच युरापियन देशांना निर्यात होणा-या द्राक्ष बागायतदाराचे बागाचे  नुतनीकरण/नविन नोंदणी दि. ३० सप्टेबर २००५ च्या आत करण्याकरीता खास मोहिम घेऊन कार्यवाही करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत चालु वर्षात दि. ३० सप्टेबर २००५ नंतर निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोदणी करण्यात येवु नये.

 

      नोदणीकृत निर्यातक्षम द्राक्ष बागाची तपासणी करण्याकरीता तपासणी अधिका-यांचे आदेश त्वरीत काढण्यात यावेत व तपासणी अधिका-याची नांवे, पुर्ण पत्ता, दुरध्वनी क्रमांक व स्वाक्षरीचा नमुना यांची माहिती सोबत जोडलेल्या प्रपत्र-अ मध्ये दोन प्रतीत त्वरीत या कार्यालयात पाठविण्यात यावी. सदरची यादी अपेडा एनआरसी व उर्वरीत अंश चाचणी प्रयोग शाळेंना द्यावयाची आहे.

 

      मागील वर्षी आपल्या जिल्हयातुन निर्यात करण्यात आलेल्या द्राक्ष निर्यातदारांची नांवे, पुर्णपत्ता, दुरध्वनी क्रमांक इत्यादी माहिती सोबत जोडलेल्या प्रपत्र-ब मध्ये त्वरीत या कार्यालयात पाठविण्यात यावी. तसेच आपल्या जिल्हयात द्राक्षाची पॅकिंग, ग्रेडींग व प्रिकुलींग व साठवणूक करण्याकरीता अपेडा यांनी रिकगनेशन केलेल्या शितगृहांची यादी  दोन प्रतीत पाठविण्यात यावी.

 

      मागील वर्षाप्रमाणेच चालु वर्षीही निर्यातक्षम द्राक्षामधील किडनाशक उर्वरीत अंश नियंत्रणाबाबत अपेडा यांनी विहित केलेल्या मार्गदर्शक सुचनामधील सर्व बाबींची काटेकोरपणे अमलबजावणी करण्याची कार्यवाही करावी.

 

 

Print this Page

 

 

Home | Site Map | Disclaimer | Contacts | Feedback

This portal is designed by National Informatics Centre (NIC)
Best viewed with 1024 by 768 Screen Resolution