SFAC HOME

छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघाची उदिदष्टये खालीलप्रमाणे आहेत.

  • छोटया शेतक-यांची (अल्प व अत्यल्प भूधारक) शेती व्यापारक्षम करण्यासाठी सर्व बाबींचा विचार करुन शासनास योग्य तो धोरणात्मक निर्णय घोण्यासाठी शिफारस करणे.तसेच शासनाचे इतर विभाग व संस्था इ.मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेऊन त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणेबाबत शिफारस करणे.केंद्र व राज्य शासनाने व्यापारक्षम शेतीशी निगडित सोपविलेल्या कोणत्याहि योजना राज्य शासनाच्या यंत्रणेमार्फत राबविणे.
  • छोटया शेतक-यांच्या शेतीचा व्यापारक्षम दृष्टीने विकास करण्यासाठी आवश्यक असलेली इतर कोणतीही योजना राबविणे उदा. व्हेंचर कॅपिटल ची स्थापना करणे,नवीन तंत्रज्ञान (उदा.कोरडवाहुशेती,कृषि प्रक्रिया,पणन व प्रमाणिकरण)विकसित करणे इ.
  • बँकेच्या सहकार्याने कृषि उद्योग स्थापन करण्यास मदत करणे.
  • कृषि उद्योग प्रकल्पांमध्ये खाजगी गुंतवणुक करण्यास प्रोत्साहन देऊन उत्पादकास उत्पादन विक्रीची हमी देणे,त्याद्वारे ग्रामीण उत्पन्न व रोजगार वाढविणे.
  • कृषि उद्योग प्रकल्पाद्वारे कच्च्या मालाची उत्पादन व त्यावरील प्रक्रिया ही साखळी मजबुत करणे.
  • शेतकरी,उत्पादनगट,कृषि पदवीधर यांचा या योजनेत सहभाग वाढविण्यसाठी मदत करणे.
  • प्रकल्प स्थापन करण्याच्या हेतुने कृषि उद्योजकांसाठी प्रशिक्षण व भेटी आयोजित करणे.